पुणे

रेझांगलच्या लढाईची उलगडली अपूर्व समरगाथा

CD

पुणे, ता. १७ ः लडाख भागातील सतरा हजार फूट उंचीवरील रेझांगलाची खिंड... तापमान शून्य अंश सेल्सियसपेक्षाही कमी... समोर हजारोंच्या संख्येतील चिनी सैनिक... अशा प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने उभी राहिली भारतीय लष्कराची १३ कुमाऊ रेजिमेंटची मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली चार्ली कंपनी ही १२० सैनिकांची तुकडी. त्यांनी तब्बल १३०० हून अधिक चिनी सैनिकांना यमसदनी पाठवत अतुलनीय शौर्य गाजवले. ही अपूर्व समरगाथा पुणेकरांसमोर रविवारी उलगडली.

निमित्त होते, भारत-चीनमधील १९६२ च्या युद्धाला ६२ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल असीम फाउंडेशनतर्फे आणि जागर संस्थेच्या सहकार्याने आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी झालेले ब्रिगेडियर आर. व्ही. जठार (निवृत्त) यांच्या अनुभव कथनातून आणि जागर संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या नाट्य अभिवाचनातून या लढाईची शौर्यगाथा समोर आली. भारावून टाकणाऱ्या या अनुभवकथनानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला वंदन केले.

याप्रसंगी असीम फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी, फाउंडेशनचे सल्लागार आणि लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त), लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) आदी उपस्थित होते. सुरुवातीला सारंग गोसावी आणि सुदर्शन हसबनीस यांनी भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी विशद केली. त्यानंतर जागर संस्थेचे कलाकार अमित वझे, गजानन परांजपे, अक्षय वाटवे आदींनी नाट्य अभिवाचनातून या लढाईची कहाणी सादर केली.

ब्रिगेडियर जठार (निवृत्त) म्हणाले, ‘‘ही लढाई खरोखर अतुलनीय शौर्याचे जिवंत उदाहरण आहे. कोणत्याही लढाईत तुकडीचा प्रमुख अधिकारी शेवटपर्यंत आपल्यासोबत राहिला, तर सैनिकांनाही लढण्याचे बळ येते. तेच या लढाईबाबत झाले. आजघडीला चीन आपल्यापेक्षा सशक्त आहे, पण आपणही कमकुवत नाही. आपणही दिवसेंदिवस शक्तिशाली होत आहोत. कमी शक्तिशाली देशांनी त्यांच्यापेक्षा बलाढ्य देशांना हरवल्याची उदाहरणे आहेतच. त्यामुळेच आजच्या परिस्थितीत कोणत्याही क्षणी चीनचा सामना करण्यासाठी आपण सक्षम आहोत.’’ संस्कृती बापट यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT