पुणे

कर्णकर्कश गाण्यांचा केला करेक्ट ‘कार्यक्रम’

CD

मयूर कॅालनी, ता. २४ : प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझचा गाण्यांचा कार्यक्रम कोथरूडमधील शिवतीर्थनगर भागात आज (ता. २४) सायंकाळी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र परिसरातील रहिवासी क्षेत्राला होणारा त्रास पाहता रहिवाशांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शविला. विरोधाचे जागोजागी फलक लावण्यात आले.
गायक दिलजीत दोसांझ याला किंवा त्याच्या गायनाला विरोध नसून, कार्यक्रमात होणारे मद्यपान आणि कर्कश्य आवाजाला आमचा विरोध आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी कार्यक्रमात मद्यविक्रीला कोणतीही परवानगी दिलेली नाही. कार्यक्रमाच्या मागील बाजूस वनपरिक्षेत्र आहे, तर समोरील बाजूस शिक्षकनगर, कांचनबन, साम्राज्य, स्वरांजली, सीमा गार्डन, शुभतेज, हिमालय अशा अनेक मोठ्या सोसायट्या आहेत. रस्ते अरुंद असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होणार आहे, यामुळे विरोध केला असल्याचे रहिवाशांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनातील आर्यन नवले यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या कार्यक्रमाला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच एक नागरिक म्हणून विरोध आहे. फक्त मद्यपान आणि विक्रीसाठी विरोध नाही, तर या कार्यक्रमामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि कर्णकर्कश आवाजालासुद्धा माझा विरोध आहे. कार्यक्रम रद्द करा, अशा सूचना मी पोलिस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे. हा कार्यक्रम झाला तर भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन.
- चंद्रकांत पाटील, आमदार

भजप, मनसे, आपचा विरोध
भाजपचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष संदीप बुटाला, शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे व इतर पदाधिकाऱ्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात निवेदन देऊन कार्यक्रमााला विरोध दर्शवला. मनसे विद्यार्थी सेनेचे अमोल शिंदे तसेच आम आदमी पक्षाचे अमोल काळे यांनीआंदोलन करून विरोध दर्शविला. सकल मातंग समाज कोथरूडचे अध्यक्ष विजय डाकले यांनीदेखील पोलिस ठाण्यात पत्र देऊन कार्यक्रम बंद पाडू, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

Shravan Special Recipe: १ वाटी भगर अन् ओले खोबरे; उपवासासाठी बनवा मऊसूत आणि जाळीदार वरीचे घावन!

ढिंग टांग : पुणे म्हंजे प्रेम..!

SCROLL FOR NEXT