पुणे, ता. २९ ः मोठ्या प्रमाणात व अनेक वर्षे मिळकत कर थकविणाऱ्यांकडून वसुलीसाठी आता महापालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा संबंधित थकबाकीदारांच्या दारात बॅंड वादन प्रयोग राबविला जाणार आहे. एकीकडे मालमत्ता जप्ती, तर दुसरीकडे थकबाकी त्वरित भरावी यासाठी बॅंड वादनाचा प्रयोग केला जाणार आहे. त्याची सुरवात एक डिसेंबरपासून केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर मार्च ते जून या कालावधीत महापालिकेचे अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. याबरोबरच महापालिकेच्या अंतर्गत बदलीची प्रक्रियादेखील याच कालावधीत झाली. संबंधित बदली झालेले कर्मचारी रुजू झाल्यानंतर ते देखील पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले. त्यामुळे महापालिकेच्या इतर विभागांबरोबरच कर संकलन विभागाच्या मिळकत कर वसुलीच्या कामावरही परिणाम झाला. दरम्यान, कर वसुलीचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी कर संकलन विभागाने पुन्हा एकदा थकबाकीदारांच्या घरासमोर बॅंड वादनाचा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे.
अशी आहे स्थिती
- महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात २ हजार ७२८ कोटींचे उद्दिष्ट
- नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत १ हजार ७७५ कोटींचाच कर जमा
- ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मिळकत करापोटी सुमारे ९५० कोटी रुपये येणे अपेक्षित
- त्यामुळे कर संकलन विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतींच्या जप्तीसह, त्यांच्या दारात बॅंड वाजविण्याचे ठरविले आहे
- १ डिसेंबरपासून त्यास सुरवात केली जाणार आहे
- मोठ्या थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या शंभरहून अधिक
- कर संकलन विभागाकडून पाच पथके तयार
- दोन दिवसांत थकबाकीदारांच्या १० मिळकती जप्त
मोठ्या प्रमाणात व अनेक वर्षे थकबाकी असणाऱ्या मिळकतकरधारकांकडून वसुलीसाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी महापालिकेची पथके तयार आहेत. त्यांच्यासमवेत बॅंड पथकेही असतील.
- माधव जगताप, विभाग प्रमुख, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.