पुणे

सायबर चोरट्यांकडून सव्वा कोटींची फसवणूक

CD

पुणे, ता. ७ : पोलिस, सीबीआय कारवाईची भीती दाखविणे, तसेच घरातून कामाची संधी अशा अनेक प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत नागरिकांची एक कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक केली.
वाघोली भागातील एका तरुणाला अटक करण्याची भीती दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडून ४१ लाख ४० हजार रुपये उकळले. एका प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्वरित पैसे दिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाघोली (लोणीकंद) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
परदेशी चलन व्यवहारात गुंतवणुकीच्या आमिषाने वाघोलीतील एका तरुणाची ३३ लाख ७८ हजार ३२० रुपयांची फसवणूक केली. याबाबत तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
कोथरूड भागातील एका महिलेची घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून चोरट्यांनी चार लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली. सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी परतावा दिला. परतावा मिळाल्यानंतर आणखी रक्कम गुंतविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने हडपसर परिसरातील एकाची सायबर चोरट्यांनी ४९ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २१ डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला होता. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तक्रारदाराला पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला त्याला परतावा दिला. त्यानंतर तक्रारदाराने आणखी रक्कम चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केली. पैसे जमा केल्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT