पुणे, ता. १३ : पुणे पुस्तक महोत्सवात ‘एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ हा विश्वविक्रम शनिवारी (ता.१४) नोंदविला जाणार आहे. महोत्सवातील हा दुसरा विश्वविक्रम असणार आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा विश्वविक्रम होणार असल्याने, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सव फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून (ता. १४) होत आहे. महोत्सवात एकूण पाच विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यातील दुसरा विश्वविक्रम शनिवारी दुपारी चार वाजता पूर्ण होणार असल्याचे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
पुणे पुस्तक महोत्सवात लेखक आणि जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने ‘गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्यात येणार आहे. ‘एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम असणार आहे. ‘गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’च्या प्रशासनाने यंदा ही नवीन श्रेणी खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार केली आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे सदस्य मिलिंद वेर्लेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.