पुणे

राज्यात लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’

CD

पुणे, ता. २ : राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीतर्फे नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ आयोजित करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्याकरिता इच्छुक स्टार्टअप्सनी ‘https://www.msins.in’ या संकेतस्थळाला भेट देऊन १ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. कौशल्य विकास दिंडीच्या निमित्ताने मंत्री लोढा पुण्यात आले असताना, त्यांनी ही माहिती दिली.
लोढा म्हणाले, ‘‘राज्यातील स्टार्टअप्सना सरकारसोबत काम करण्याची आणि प्रशासनात नावीन्यता आणण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विजेत्या २४ स्टार्टअपना त्यांच्या उत्पादन तथा सेवेची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी पंधरा लाख रुपयांपर्यंतचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात. कृषी, शिक्षण व कौशल्य, प्रशासनातील तंत्रज्ञान, आरोग्य, गतिशीलता, अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वत क्षेत्र (स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन) या क्षेत्रात काम करणारे स्टार्टअप यात सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.’’
स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात लवकरच आयोजित होणार आहे. याद्वारे स्टार्टअप परिसंस्था आणि गुंतवणूकदार यांच्यातील सहकार्याला चालना देणे, स्टार्टअपना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे, यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.

अधिक माहितीसाठी...
राज्यात नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नावीन्यता क्षेत्राशी संबंधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. याबाबत अधिक माहितीसाठी सोसायटीच्या ‘https://www.msins.in’ या संकेतस्थळावर तसेच ‘team@msins.in’ या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT