नागालँडच्या तरुणाला
बाणेर टेकडीवर मारहाण
पुणे, ता. ३० : बाणेर टेकडीवर मित्रासमवेत गेलेल्या नागालँडच्या महाविद्यालयीन तरुणाला शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोळक्याने लोखंडी हत्याराने मारहाण करून लुबाडले. पीजेंदाई कामेई (वय १९, सध्या रा. जुनी सांगवी, मूळ रा. नागालँड) असे तरुणाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात चार अनोळखी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर कामेईकडील २० हजार रुपयांचा मोबाईल आणि इतर साहित्य हिसकावून पसार झाले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले तपास करीत आहेत.
---
गुंजन चौक परिसरात
प्रौढाचा मोबाईल लुबाडला
पुणे, ता. ३० : येरवडा येथील गुंजन चौकातून चालत निघालेल्या एका प्रौढाचा मोबाईल चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अजहर आलम अन्सारी (वय १९, रा. कात्रज) असे आरोपीचे आहे. मुळचा छत्रपती संभाजीनगर येथील प्रौढ रविवारी सकाळी रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अन्सारीने त्यांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता.
---
महिलेची सोनसाखळी
चोरणाऱ्या तरुणीस अटक
पुणे, ता. ३० : ज्येष्ठ महिलेला (वय ७९, रा. धनकवडी) धक्का मारून ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरणाऱ्या तरुणीस पोलिसांनी अटक केली. दीपा चव्हाण (वय ३४, रा. धनकवडी) असे तरुणीचे नाव आहे. धनकवडीमधील छत्रपती संभाजीनगर परिसरात रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पद्मावती हाऊसिंग सोसायटीसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---
तरुणाला मारहाण
करून मोबाईल चोरी
पुणे, ता. ३० : चोरट्यांनी तरुणाला मारहाण करून मोबाईल चोरल्याची घटना खराडी जकात नाक्याजवळ रविवारी मध्यरात्री घडली. याबाबत आकाश आगळे (वय २०, रा. खराडी) या तरुणाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सुरक्षारक्षक असून तो रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पायी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याला मारहाण करून मोबाईल हिसकावून नेला.
------
अमेरिकन डायमंडच्या
नेकलेस सेटची चोरी
पुणे, ता. ३० : दोन अनोळखी महिलांनी एका सराफाच्या दुकानातून तीन लाख रुपयांचा अमेरिकन डायमंडचा नेकलेस सेट चोरून नेला. ही घटना रविवारी (ता. २९) सकाळी शुक्रवार पेठेत घडली. या प्रकरणी सराफ व्यावसायिकाने (वय २९, रा. शुक्रवार पेठ) फिर्याद दिली. त्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी व्यावसायिकाची नजर चुकवून चोरी केली.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.