पुणे

पायलटच्या चुकीमुळेच हेलिकॉप्टर कोसळले

CD

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ ः बावधनजवळील लवळे परिसरात बुधवारी सकाळी दृश्यमानता शून्य असूनही पायलटने हेलिकॉप्टरचे उड्डाण केले. त्याला दिशेचा अंदाज आला नाही. त्याच्या चुकीमुळे बुधवारी ही दुर्घटना घडल्याचे हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
उड्डाणानंतर हेलिकॉप्टर तीन ते चार मिनिटांतच कोसळले. गुरुवारी सकाळी ‘डीजीसीए’ (नागरी वाहतूक महासंचालनालय) व ‘एएआययु’ (एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन युनिट) यांच्या पथकाने अपघातस्थळाची तसेच हेलिकॉप्टरने जेथून उड्डाण केले त्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडची पाहणी केली. हेलिकॉप्टरच्या अवशेषांमधून ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ व ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ ही दोन्ही उपकरणे ताब्यात घेऊन पथकातील तज्ज्ञ दुपारी दिल्लीला परत रवाना झाले.
या दुर्घटनेत पायलटसह तीन जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण दोन उपकरणांच्या तपासणीतून कळेल, मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दृश्यमानता अजिबात नसल्याने पायलटला काहीच दिसले नाही. धुके हटल्यानंतर उड्डाण झाले असते तर दुर्घटना टळली असती. त्यामुळे हा अपघात पायलटच्या अर्थात मानवी चुकीमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
---

निर्णयक्षमतेबाबत हवे प्रशिक्षण
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही पायलटना हेलिकॉप्टरचा मोठा अनुभव होता. पायलटना ‘क्रू’ स्रोत व्यवस्थापन, संवादकौशल्यासह निर्णयक्षमतेचेही प्रशिक्षण दिले जाते. यात परिस्थितीचे परीक्षण व आकलन करून निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्याचा समावेश असतो. या बाबतीत मात्र वैमानिकाचे परिस्थितीबाबतचे आकलन चुकले आहे. त्यामुळे वैमानिकांना देण्यात येणारे प्रशिक्षणात ‘डीजीसीए’ने यादृष्टीने भर देणे गरजेचे आहे.
-------------
एखाद्या विशिष्ट क्षेत्रात वारंवार अपघात होत असतील तर संबंधित विभागाने हवाई क्षेत्राचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. हेलिपॅडच्या ठिकाणी काही बदल झाले आहेत का याचेही अवलोकन करण्याची आवश्यकता आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT