पुणे

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी

CD

पुणे, ता. ३ : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकाने अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या निंदनीय घटनेची गांभीर्याने दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांना सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांनी अनेक सूचना केल्या आहेत. ‘महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०११ आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी वारंवार करण्यात यावी. पोलिसांकडून वाहनचालक आणि इतर मदतनीसांच्या चारित्र्याची पडताळणी केली जावी. प्रत्येक वाहनामध्ये महिला मदतनीस ठेवाव्यात. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत. वाहनाचा वेग मर्यादित असावा. वाहन तांत्रिकदृष्ट्या पूर्णतः योग्य असावे. शाळेच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी वाहनचालक व सहाय्यकांना सूचना द्याव्यात. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वाहन चालकांची शारीरिक व मानसिक चाचणी करावी. राज्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याकडे लक्ष द्यावे,’ अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT