पुणे, ता. ५ : साधू वासवानी पुलाचे कोरेगाव पार्क भागाकडील पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता तेथे खोदाई करून नवीन पुलासाठी आवश्यक पाया करण्याच्या कामाला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूकडील पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘ब्लॉक’च्या वेळापत्रकाला मंजुरी मिळणे आवश्यक असून, त्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे.
साधू वासवानी पुलाला ५०वर्षे झाल्याने तो वाहतुकीसाठी धोकायदायक ठरला होता. त्यामुळे हा पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. नवीन पूल बांधण्याच्या कामाचे मागील वर्षी एप्रिल महिन्यात उद्घाटन होऊनही वेगवेगळ्या कारणांमुळे प्रत्यक्षात कामाला विलंब होत गेला. कामास विलंब होत असल्याच्या प्रश्नावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून कोरेगाव पार्ककडील पूल पाडण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर जून महिन्यात पाडकामाला सुरुवात झाली. त्यानुसार, कोरेगाव पार्ककडील भागातील जुना पूल पाडण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. तेथे नवीन पुलाचे काम करण्यासाठी आवश्यक खोदाई करून पाया करण्याचे काम महापालिकेने आता सुरू केले आहे.
दरम्यान, साधू वासवानी पुलाच्या पुणे कॅन्टोन्मेंटकडील दुसऱ्या बाजूचे पाडकाम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉकचे वेळापत्रक मिळण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने रेल्वेकडे त्यासाठी पाठपुरावा केला आहे. वाहतुकीच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लोहमार्गावरील पूल पाडण्याचे सलग काम करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून महापालिकेला टप्प्याटप्यानुसार दिल्या जाणाऱ्या वेळेनुसार (ब्लॉक) आणि रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली संबंधित काम करण्यात येणार आहे. मात्र, त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही.
साधू वासवानी पुलाच्या कोरेगाव पार्ककडील पुलाचे पाडकाम पूर्ण होऊन पायाचे काम सुरू केले आहे. पुणे कॅन्टोन्मेंटकडील बाजूच्या पुलाचे पाडकाम करण्यासाठी रेल्वेच्या ब्लॉकचे वेळापत्रक मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पुलाखालील झोपड्या हटविण्यासाठीची प्रक्रियाही सुरू आहे.
-युवराज देशमुख, विशेष प्रकल्प विभागप्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.