पुणे

‘महानायका’च्या वाढदिवसाचे अनोखे ‘सेलिब्रेशन’

CD

पुणे, ता. ९ ः ‘अँग्री यंग मॅन’ ते ‘महानायक’ असा प्रवास करणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे अनोखे ‘सेलिब्रेशन’ शुक्रवारी (ता. ११) पुण्यात रंगणार आहे. बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शहेनशहा - पडद्यावरच्या ‘अँग्री यंग मॅन’ला सांगीतिक सलाम’ हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे रंगणार आहे. बच्चन यांच्या चित्रपटातील गाजलेली गाणी, त्यांचे काही किस्से व आठवणी, त्यांच्या गाजलेल्या संवादांचे अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’, ‘द नेचर - मुकाईवाडी’ आणि ‘इम्पेरिअल प्लाझा’ हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com आणि ticketkhidakee.com या संकेतस्थळावर जाऊन आरक्षित करता येणार आहेत.
या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय प्रायोजक कोलते-पाटील डेव्हलपर्स तर सहयोगी प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’, ‘द नेचर - मुकाईवाडी’ आणि ‘इम्पेरिअल प्लाझा’ आहेत.
कार्यक्रमाची संहिता आणि बांधणी प्रसिद्ध कवी-गीतकार वैभव जोशी यांची आहे. नियोजन ‘ब्‍ल्यू रॅम्प’ यांचे आहे. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा विशेष सहभाग असून ते काही गाणी सादर करणार आहेत, तसेच बच्चन यांचे काही किस्से सांगणार आहेत. अभिनेते सुमीत राघवन आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर निवेदन करणार असून सुमीत राघवन देखील काही गाणी सादर करणार आहेत. अभिनेते हृषिकेश जोशी हे काही कवितांचे, संवादांचे अभिवाचन करणार आहेत. गायक राहुल देशपांडे, जसराज जोशी, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, जितेंद्र भुरूक हे बच्चन यांच्या चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करणार आहेत.

३० वादकांचा भव्य वाद्यवृंद
या विशेष कार्यक्रमात प्रख्यात हिंदी-मराठी कलाकारांसह ३० वादकांचा भव्य वाद्यवृंदही सहभागी होणार आहे. यात जितू ठाकूर, अनुप घटक, नागेश कोळी, सुरेश अय्यर, अशोक सहानी, चिराग पांचाळ, अमर ओक, केदार परांजपे, प्रसाद गोंदकर, सूरज खान आदी नामवंत वादकांचा समावेश आहे. कोरससाठी सिंगर्स फ्रेंड्स ग्रुप’चे दहा कलाकार सहभागी होणार आहेत. ध्वनिव्यवस्था नीलेश यादव यांची तर प्रकाशयोजना हर्षवर्धन पाठक यांची असणार आहे.


अमिताभ बच्चन हे सर्वच रसिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे अशा अनोख्या पद्धतीने ‘सेलिब्रेशन’ करण्याची कल्पना आम्हाला अतिशय आवडली. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आणि तो साजरा करण्यासाठी दिग्गज कलाकारांचे सादरीकरण, असा हा दुग्धशर्करा योग आहे. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी एक परिपूर्ण सांस्कृतिक पर्वणी असेल, याची खात्री वाटते.
- सुशीलकुमार देशमुख, चेअरमन, ‘द नेचर - मुकाईवाडी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT