पुणे, ता. २७ : मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी महापालिकेने भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु. ल. देशपांडे उद्यान येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, ते रविवार(ता.२८)पर्यंत खुले असणार आहे.
महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीने ग्रंथ व विविध साहित्य प्रदर्शन भरविले आहे. साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी मराठी भाषा संवर्धन समितीचे माजी सदस्य अनिल गोरे, श्याम भुर्के, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे आदी उपस्थित होते.
मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, बोली भाषा शिकण्याची गरज याबाबत डॉ. बर्वे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रंथप्रदर्शनात कथा, कविता, कादंबरी, नाटक, बाल साहित्य, बोधकथा, आर्थिक, विज्ञान, आरोग्य, आध्यात्मिक अशा विविध विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.