तंत्रज्ञानाकडे वरदान म्हणून
पाहावे ः डॉ. मिलिंद पांडे
पुणे, ता. ३ : ‘तंत्रज्ञानाकडे एक वरदान म्हणून पाहणे आणि मार्गदर्शक म्हणून त्याचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे,’ असे मत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी व्यक्त केले.
नॉन रेसिडेंट इंडियन्स पेरेंट्स ऑर्गनायझेशनने (नृपो) आयोजित केलेल्या सदस्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी सुरेश नाईक, वैदेही कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पांडे म्हणाले की, ‘‘सरकारही स्टार्टअप आणि आत्मनिर्भरसारख्या मोहिमांच्या माध्यमातून नव्या पिढीला दिशा देण्याचे काम करीत आहे. तंत्रज्ञानामुळे माणसे जोडली जात आहेत, पण माणसांची मने जोडणेदेखील महत्त्वाचे असते.’’
या वेळी डॉ. प्रचिती सुरु-कुलकर्णी यांनी ‘मुक्ताई- एक मुक्ताविष्कार’ हा कार्यक्रम सादर केला. वैदेही कुलकर्णी संपादित ‘नृपोजगत्’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. विशेषांकासाठी योगदान दिलेल्या समितीच्या पाच सदस्यांचा सत्कार डॉ. पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष बी. बी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात संस्थेची उद्दिष्ट्ये विशद करून कार्याचा आढावा घेतला. सचिव विद्याधर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजेंद्र माहुलकर यांनी आभार मानले.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.