पुणे

आर्थिक नियोजन व आर्थिक साक्षरता कार्यशाळा

CD

पुणे, ता. ३ : आजच्या काळात आर्थिक नियोजन व बचतीचे महत्त्व काय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असे असूनही सुयोग्य आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत अनेकांना माहिती नाही. या पार्श्वभूमीवर आर्थिक साक्षरतेविषयी व सुयोग्य आर्थिक नियोजन कसे असावे याबाबत मार्गदर्शन करणारी तीन तासांची कार्यशाळा १० मार्चला आयोजिली आहे. यात मासिक उत्पन्नाची योग्य विभागणी कशी करावी, बचतीच्या पैशांतून पैसे कसे कमावता येतात, नोकरी गेली किंवा व्यवसायात मंदी आली तर कोणत्या उपाययोजना कामी येतात, कर्ज कोणत्या परिस्थितीत काढावे, गुंतवणूक कोठे करावी, गुंतवणुकीचा निर्णय कसा घ्यावा व संभाव्य धोके कसे ओळखावे, सर्व आर्थिक व्यवहार कुठल्या मार्गाने करावेत, कुठले टाळावेत, मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि स्वतःच्या निवृत्तीसाठी खात्रीशीर रिटर्न असणाऱ्या तरतुदी कुठल्या, टॅक्स रिटर्न फाइल कसे करावे, क्रेडिट कार्ड, टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

‘एनजीओ’ची स्थापना, नोंदणी व कार्यपद्धती
राज्य व देशपातळीवर अनेक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आहे. विविध कामांसाठी ‘एनजीओं’ना प्राधान्य दिले जात असल्याने याद्वारे विकास, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अशा या स्वयंसेवी संस्थेची स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा १० मार्चला आयोजिली आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

राजकीय क्षेत्रात करिअर व संधी
राजकीय नेतृत्व विकास ही कार्यशाळा राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या किंवा आधीच या क्षेत्रात काम करत असून त्यामध्ये अजून प्रावीण्य मिळवायची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आयोजिली आहे. ९ व १० मार्चला होणाऱ्या या कार्यशाळेला राजकीय विश्‍लेषक, राजकीय अभ्यासक, निवडणूक शास्त्रातील अनुभवी तज्ज्ञ, स्वतः प्रचार यंत्रणा राबविणाऱ्या अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेत राजकारणाकडे करिअर म्हणून कसे पहावे, संवाद व माध्यमांद्वारे प्रतिमा निर्मिती कशी करावी, राजकीय संभाषण व भाषण कौशल्य, पक्ष संघटना, निवडणूक व्यवस्थापन, जनमताचा कौल, कार्यालय व्यवस्थापन व कार्यकर्ता संघटन, निवडणूक प्रचार व प्रसार आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणांचे ठिकाण : सकाळ मीडीया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलन? पोलिसांनी गुन्हे मागे न घेतल्याने नव्या आंदोलनाचा इशारा

शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

Latest Marathi News Live Update: तितंबा आश्रमशाळेतील ६९ मुलांना पोटदुखी आणि मळमळीचा त्रास जाणवला

Riya Ahir: सतत धमक्या आणि शिवीगाळ, मुंबई पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरचा ऑनलाईन छळ; सायबर सेलकडे धाव

Vitthal Ban Cleanliness Drive : ‘विठ्ठल बन’ डाळींब येथे १६० ग्रामदूतांनी २ तासांत ६ टन कचरा हटवून मंदिर परिसर चकाचक

SCROLL FOR NEXT