International Women's Day SAkal
पुणे

International Women's Day : एस. एम. जोशी सभागृहात ‘जागर स्त्री जाणिवांचा’

जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य शिवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यातर्फे ‘जागर स्त्री जाणिवांचा’ हा विशेष कार्यक्रम येत्या शुक्रवारी (ता. ८) नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : जागतिक महिला दिनानिमित्त साहित्य शिवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यातर्फे ‘जागर स्त्री जाणिवांचा’ हा विशेष कार्यक्रम येत्या शुक्रवारी (ता. ८) नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.

या विशेष कार्यक्रमाचे उद्‍घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ लेखिका डॉ. मंदा खांडगे प्रमुख पाहुण्या असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. संजीवनी मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

या कार्यक्रमात वक्त्या म्हणून दै. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, संज्ञापन वृत्तपत्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा आणि सी. ए. डॉ. रेवती पैठणकर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘साहित्य शिवार’चे संपादक जयराम देसाई आणि संज्ञापन वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू ट्रकची ४ गाड्यांना धडक, विहिरीत कोसळला ट्रक; चालक खाली दबला असल्याची शक्यता

समृद्धीवर रीलच्या नादात बसचा अपघात, दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; २५ जण जखमी, उपचाराला नेलं तर रुग्णालयात डॉक्टरच नव्हते

Ajinkya Rahane: सलग 5 पराभवानंतर मोठा स्फोट! अजिंक्य रहाणे म्हणतो बिनधास्त खेळा

Latest Marathi News Live Update: अमरावतीत जिल्हा परिषदेच्या गेटजवळ आढळला मृतदेह

अक्षय तृतीयानिमित्त आज भेंडवळची घटमांडणी; साडेतीनशे वर्षापासून पीक पाण्याचा अंदाज व भाकीत वर्तवणारी परंपरा काय?

SCROLL FOR NEXT