pmc sakal
पुणे

Pune News : पुणे महापालिकेतील उपअभियंता रोकड प्रकरण ;एका दिवसात अहवाल द्या - विक्रम कुमार

पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेकेदाराने ठेवलेले लाखो रुपये सापडले तरी, अधिकारी चौकशी करण्यासाठी तयार नव्हते.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पथ विभागाच्या उपअभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेकेदाराने ठेवलेले लाखो रुपये सापडले तरी, अधिकारी चौकशी करण्यासाठी तयार नव्हते. अखेर अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त विक्रम कुमार यांना यासंदर्भात प्रश्‍न विचारल्यानंतर पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे आता या अहवालातून नेमके काय उघड होणार याकडे लक्ष लागले आहे. मंगळवारी (ता. ५) दुपारी महापालिकेत पथ विभागाच्या उपअभियत्यांच्या ड्रॉवरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी पकडले. हे पैसे ठेकेदाराचे असल्याचे उपअभियंत्याने या कार्यकर्त्यांना सांगितले. महापालिकेत लाचखोरीचा प्रकार सुरु असल्याचा आरोप ‘आप’चे कार्यकर्ते रविराज काळे यांनी आहे.

यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘उपअभियंता व तक्रारदार या दोघांचीही बाजू ऐकून घेऊन त्याचा आज (ता. ७) सायंकाळपर्यंत किंवा उद्या (ता. ८) सकाळपर्यंत याचा अहवाल सादर करावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करेलच पण चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे यांनी या प्रकरणात महापालिकेची प्रचंड बदनामी झाली आहे, त्यामुळे आयुक्तांनी संबंधित उपअभियंत्याचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे यांनीही सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

बिबट्या प्रकरणात अहवाल मागविला

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात बिबट्या पिंजऱ्यातून पळाला. याची दखल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने घेतली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्राधिकरणाने मागितला आहे. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही खुलासा मागितला आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT