पुणे

निवडणूक आयोगाने निःपक्षपाती राहावे

CD

पुणे, ता. २५ : सरकारी यंत्रणा आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर दबाव आणला जात आहे. देशातील निवडणूका लोकशाही मार्गाने, निःपक्षपातीपणे आणि भयमुक्त वातावरणात व्हायला हव्यात. निवडणूक आयोगानेही निःपक्ष राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत संविधान वाचविण्यासाठी नागरिकांनी भाजपविरोधी मतदान करावे, असे आवाहन ‘भारत जोडो अभियाना’चे इब्राहिम खान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. या वेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतर घडलेल्या घटनांची माहिती देऊन देशातील यंत्रणांवर भाजपचा प्रचंड दबाव असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. येणाऱ्या काळात निवडणुकाच रद्द होण्याची शक्यता आहे. तेव्हा जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या सर्वच संस्थांना गुलाम बनविले जात आहे. तसेच भाजप संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपदेखील या वेळी करण्यात आला.
या पत्रकार परिषदेस दीप बर्वे (युवक क्रांती दल), प्रशांत कोठडिया (संवैधानिक राष्ट्रवाद मंच), उत्पल व. बा. (निर्भय बनो), प्रसाद झावरे (पुणे कलेक्टिव्ह) श्रीरंजन आवटे, उमेश ठाकूर, एकनाथ पाठक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचे आदेश मनमानी करणारे अन् एकतर्फी, FDA कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Gold Rate Today: 2 दिवसांच्या तुफान वाढीनंतर सोनं घसरलं! महाराष्ट्रात आज 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Buddha Vihar Fund Controversy : थिबाराजाकालीन बुद्धविहारासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधींच्या निधीवरून पेटला वाद; थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

SCROLL FOR NEXT