SPPU News sakal
पुणे

SPPU News : प्रवेश वाढविण्याचे विद्यापीठासमोर आव्हान ; विद्यार्थ्यांची संख्या कायम राखण्यासाठी विभागांना विशेष प्रयत्न करावे लागणार

प्रवेश परीक्षेला झालेला उशीर, प्लेसमेंटचा अभाव आणि कालबाह्य अभ्यासक्रमांमुळे दिवसेंदिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. मागील वर्षी अनेक विभागांमधील प्रवेश संख्या रोडावल्याचे चित्र होते. यंदा ही प्रवेशसंख्या कायम राखण्यासाठी विद्यापीठाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रवेश परीक्षेला झालेला उशीर, प्लेसमेंटचा अभाव आणि कालबाह्य अभ्यासक्रमांमुळे दिवसेंदिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. मागील वर्षी अनेक विभागांमधील प्रवेश संख्या रोडावल्याचे चित्र होते. यंदा ही प्रवेशसंख्या कायम राखण्यासाठी विद्यापीठाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे.

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ओळख असलेल्या विद्यापीठात एकेकाळी प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असायची. आजही देशभरातील विद्यार्थी विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करतात. मात्र, सर्वात उशिरा प्रवेश प्रक्रिया पार पाडत असल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झालेले असतात. त्यातच खासगी विद्यापीठांचे आव्हानही विद्यापीठासमोर असून, आपला दर्जा कायम राखण्यासाठी विद्यापीठाला मोठी पावले उचलावी लागणार आहेत. कोरोनानंतर आता विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत होत आहे. विद्यापीठाने वेळेवर प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर प्रत्यक्ष गुणवत्ता यादी घोषित करत विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करणे विभागांसमोरील आव्हान असणार आहे.

पारंपारिक अभ्यासक्रमांकडे कल कमी
विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेला एक दीर्घ परंपरा आहे. अनेक दिग्गज विचारवंत, तत्वज्ञ, लेखक आणि संशोधक या शाखांनी दिली आहेत. मात्र, आज या विद्याशाखेतील अनेक विभागांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. याबद्दल वरिष्ठ प्राध्यापक सांगतात, ‘‘कोरोनाच्या आधीपासूनच विद्यापीठातील काही विषयांना विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एकंदरीत रोजगाराकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आणि कौशल्याभिमूख अभ्यासक्रमाच्या अभावाने विद्यार्थी विभागांमध्ये प्रवेश घेत नाहीत. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबरोबरच फक्त वसतिगृहात खोली मिळण्यासाठी देखील विद्यार्थी कला शाखेतील विभागांना प्रवेश घेतात.’’

  • कशाची अत्यावश्यकता?
    - सर्व विभागांचे शैक्षणिक ऑडिट गरजेचे
    - अभ्यासक्रम खरंच संशोधनाभिमूख किंवा कौशल्याभिमूख आहे का, याची पडताळणी होणे गरजेचे
    - अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे आवश्यक
    - वेळेवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत देशभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणे गरजेचे
    - उद्योगांचा सहभाग आणि नोकऱ्यांसाठी मेळावे घेणे आवश्यक

गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावे यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यापीठाने नुकतीच प्रवेश परीक्षेची घोषणा केली असून, वेळेवर ती पार पाडली जाईल.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT