पुणे

Teachers : शिक्षकांना जीन्स, टी-शर्ट घालण्यास मनाई; राज्य सरकारच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Pune News : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांच्या पेहरावाबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार,चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा, तर पुरुष शिक्षकांनी साधा शर्ट आणि पँट, शर्ट इन असा पेहराव करावा.

शिक्षकांनी जीन्स आणि टी-शर्टचा वापर करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तसेच शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ‘ड्रेस कोड’ ठरवावा, असे राज्य सरकारने सांगितले आहे.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचा अध्यादेश काढला आहे.

त्यामुळे आता शिक्षकांना नीटनेटक्या पेहरावातच शाळेत यावे लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्याक अशा सर्व व्यवस्थापनांतर्गत अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात.

नागरिक त्यांच्याकडे ‘गुरू’, ‘मार्गदर्शक’ म्हणून पाहतात. या शिक्षकांचा विद्यार्थी, पालक, नामांकित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क येत असतो. अशा वेळी शिक्षकांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो.

संबंधितांच्या वेशभूषेवरून त्याची छाप पडते. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहावे लागते. वेशभूषा ही आपल्या शाळेस, पदास किमान अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे.

त्या अनुषंगाने शिक्षकांच्या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याचे अध्यादेशात नमूद केले आहे. हा निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांसाठी लागू असणार आहे.

असा पेहराव करून नये

- शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेला पेहराव परिधान करून नये. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये.

‘ड्रेस कोड’बाबत सूचना

- शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ड्रेस कोड ठरवावा
- पुरुष व महिला शिक्षकांसाठी पेहरावाचा रंग कोणता असावा, हे संबंधित शाळेने निश्चित करावे
- पुरुष शिक्षकांनी फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पँट परिधान करावी
- पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे किंवा बूट वापरावेत
- ‘स्काउट गाइड’च्या शिक्षकांनी स्काउट गाइडचाच पोशाख वापरावा

शिक्षकांच्या नावापूर्वी लागणार ‘टी’

डॉक्टरांच्या नावापुढे ‘डॉ.’ किंवा वकिलांच्या नावापुढे ‘ॲड.’ असे लावले जाते. त्याप्रमाणे आता राज्यातील शिक्षकांच्या नावापुढे ‘टी’ असे संबोधन लावण्यात येणार आहे. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत ‘Tr.’ तर मराठी भाषेत ‘टी’ असे संबोधन लावण्याची सूचना राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे दिली आहे. तसेच या संदर्भातील शिक्षण आयुक्तांमार्फत बोधचिन्ह निश्चित करण्यात येणार आहे. हे संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनांवर लावता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT