Pune Loksabha Constituency sakal
पुणे

Pune Loksabha Constituency : रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी त्रिस्तरीय प्रचार यंत्रणा राबविणार

शहर, विधानसभा आणि प्रभाग अशा तिन्ही स्तरांवर महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांचा समावेश असलेल्या समन्वय समित्या स्थापन कराव्यात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर, विधानसभा आणि प्रभाग अशा तिन्ही स्तरांवर महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांचा समावेश असलेल्या समन्वय समित्या स्थापन कराव्यात. या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा, असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत बुधवारी (ता. २७) झाला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवन येथे आज आघाडीतील नेत्यांची पहिली बैठक झाली.काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड.अभय छाजेड, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अमीर शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर यांच्यासह तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या नियोजनासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभानिहाय निवडणूक कचेरी टाकणे, शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय समन्वय समिती तयार करणे, त्यात सर्व घटक पक्षाच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींचा समावेश करणे, विधानसभानिहाय निरीक्षक नेमणे आणि त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवणे, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा, तसेच निवडणुकीच्या दृष्टीने विविध समित्या तयार करणे या विषयांवर चर्चा झाली.

महाविकास आघाडीमध्ये या तीन पक्षांबरोबरच अन्य घटक पक्षांचाही समावेश आहे. ‘इंडिया फ्रंट आघाडी’तील या सर्व घटक पक्षांसोबत शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT