पुणे

एनडीए रस्त्यावर हात बॉम्ब सापडला

CD

पुणे, ता. ११ : एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) आढळून आला. पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) हात बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केला.

उत्तमनगर परिसरातील कमला देवी मंदिराच्या परिसरात पुलाचे काम सुरू आहे. या भागात खोदकाम करताना हातबॉम्ब सापडला. या घटनेची माहिती तेथील कामगारांनी त्वरित उत्तमनगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाय. एन. शेख, गुन्हे शाखेचे निरीक्षक कदम, उपनिरीक्षक अनुसे, तसेच दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाने हात बॉम्बची तपासणी केली. त्यानंतर हातबॉम्ब जिवंत नसल्याची खात्री करण्यात आली. हातबॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT