पुणे

धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुळे, कदम यांचा ‘रोड शो’

CD

पुणे, ता. ११ : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारामध्ये शनिवारी महाविकास आघाडीमधील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह युवा नेत्यांनी सहभाग घेत जोरदार प्रचार केला. कॉंग्रेस नेते डॉ. विश्‍वजीत कदम, माढ्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांचाही त्यात समावेश होता.
कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धंगेकर यांच्या प्रचारासाठीच्या रोड शोला सुरुवात झाली. यावेळी धंगेकर यांच्यासमवेत सुप्रिया सुळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, चंदूशेठ कदम, पृथ्वीराज सुतार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कॉंग्रेस, आप व विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर विश्‍वजीत कदम, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही सहभाग घेतला.
कर्वेनगर, कोथरूड गावठाण परिसरामध्ये नेत्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी उमेदवार व पक्षाच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. मतदारांना उमेदवारांचा जाहीरनामा, विविध कामांच्या माहितीची पत्रके वाटण्यात आली. अनेक ठिकाणी फटाक्‍यांच्या आतषबाजीत उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मतदारांशी थेट संवाद साधत धंगेकर यांना मतदान करण्याचे आवाहन सुळे यांनी केले. धंगेकर, कदम व धैर्यशील मोहिते पाटील यांनी कर्वे रस्ता, डेक्कन, शिवाजीनगर परिसरामध्ये खुल्या जीपमधून प्रचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

ASHOK KHARAT CASE: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण...' अशोक खरात प्रकरणी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : सोनिया गांधी उपचारांना प्रतिसाद देत आहेत, रुग्णालयाची माहिती

Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

SCROLL FOR NEXT