पहिल्याच तारखेला घटस्फोट मंजूर
पुणे, ता. २१ : विवाहानंतरचा दुरावा आणि त्यानंतरचे विकोपाचे वादविवाद दोन वकिलांच्या मध्यस्थीने सोडवून प्रकरण दाखल झाल्यानंतर केवळ एका तारखेत संमतीने घटस्फोट मंजूर होण्याची घटना नुकतीच घडली आहे.
मिनाक्षी आणि आकाश (पक्षकारांची नावे बदललेली आहेत) यांचा विवाह १८ जानेवारी २०१३ रोजी बारामती येथे झाला होता. त्यांना एक नऊ वर्षांची मुलगी आहे. स्वभावभिन्नता आणि वेगवेगळ्या कारणांमुळे त्या दोघांना एकत्र राहणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ते विभक्त राहत होते. पती आकाश यांनी घटस्फोटाचे प्रकरण दाखल करण्यासाठी अॅड. त्रिरत्ना बागुल धोकटे यांच्याकडे चर्चा केली. त्याच कालावधीत पत्नी मिनाक्षी या अॅड. संघमित्रा गायकवाड कांबळे यांना भेटल्या. दोन्ही वकिलांनी या प्रकरणात पक्षकारांसोबत प्रत्यक्ष चर्चा करण्याची परवानगी घेऊन चर्चा केल्यानंतर सकारात्मक तडजोड निश्चित झाली. मिनाक्षी यांना ९ लाख ३० हजार रुपये कायमस्वरूपी पोटगी म्हणून, तसेच मुलीचे शिक्षण व महिन्याचा इतर खर्च म्हणून दरमहा १० हजार रुपये देण्याचे, तसेच लग्नाचा एक लाख रुपये खर्च करण्याच्या, तसेच मुलीचा ताबा आईकडे राहील, या अटी शर्तींप्रमाणे दोघेही संमतीने घटस्फोटासाठी तयार झाले.
अॅड. त्रिरत्ना बागुल धोकटे आणि अॅड. संघमित्रा गायकवाड कांबळे यांनी २५ एप्रिल रोजी बारामतीमधील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एस. टी. चिकणे यांच्याकडे दावा दाखल केला. त्यात संमतीने झालेल्या तडजोडीची माहिती ॲड. धोकटे आणि ॲड. कांबळे यांनी न्यायालयाला दिली. त्याची खातरजमा करून न्यायालयाने संमतीने घटस्फोट मंजूर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.