पुणे

मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वे स्थानकावर विशेष पथक

CD

पुणे, ता. ५ ः रेल्वेतून होणारी मानव तस्करी रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महिला व बाल विकास मंत्रालयासोबत करार केला असून या अंतर्गत देशातील विविध स्थानकावर विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पुणे स्थानकासह विभागात १३ पथकांची निर्मिती केली आहे.
मानवी तस्करी हा अत्यंत गंभीर विषय आहे. लहान मुलांना यातून वाचविण्यासाठी सरकार विविध स्तरावर प्रयत्न करते आहे. देशातील काही ठिकाणी रेल्वेद्वारे तस्करी झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या बाबतीत सतर्क झाले आहे. पुणे स्थानकावर स्थापन झालेल्या पथकात एक ‘आरपीएफ’ निरीक्षकासह जवानांचा समावेश आहे. ते स्थानकावर फिरून तसेच विविध रेल्वे गाडीत फिरून संशयीतरीत्या फिरणाऱ्या व्यक्तीवर, मुलांवर लक्ष ठेवून असतात. संशयितांची चौकशी देखील करण्यात येते.

पुणे स्थानकासह विभागात मानवी तस्करी रोखण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. हे २४ तास फलाटावरील व रेल्वे गाडीतील संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून असतात. अद्याप पुणे स्थानकावर अशी कोणतेही घटना घडलेली नाही. मात्र आम्ही सदैव सतर्क आहोत.
- प्रियांका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली! येत्या काही दिवसांत विसर्ग? महाबळेश्वरसह नवजात धुवांधार पाऊस, पाहा आजचा पाणीसाठा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे रुग्णालयात तरीही 'ऑपरेशन टायगर'; ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील शिंदे सेनेत

Latest Marathi Live Update: वर्गात शिकत असताना साप शिरला; विद्यार्थ्यांमध्ये घबराट

Anjanari Ghat Accident : काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात! आंजणारी घाटात ट्रेलरचा चक्काचूर; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाला पोलिसांनी कसं वाचवलं?

Supreme Court: पती दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये? पत्नीने मागितले कॉल रेकॉर्ड; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT