पुणे

हडपसरमधून मोटारी चोरणाऱ्यास अटक

CD

पुणे, ता. ४ : हडपसर येथील दुकानातून सुमारे १० लाख रुपये किमतीच्या दोन मोटारी चोरुन नेणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. तर, त्याचा साथीदार असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पवन शंकर अलकुंटे (वय २०, रा. अलकुंटेवस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील चिंतामणी मोटर्स दुकानातून ३१ मार्चला चोरट्यांनी दोन मोटारी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पवन अलकुंटे याने त्याच्या मित्राच्या मदतीने मोटारी चोरुन नेल्या. त्यापैकी एका मोटारीची नंबरप्लेट काढून तिचा वापर तो करीत होता. यवतवरुन तो पुण्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमित कांबळे यांना मिळाली. त्यानुसार शेवाळेवाडी येथे नाकाबंदी करण्यात आली आणि अलकुंटेसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

मौजमजेसाठी चोरी
आरोपींनी मौजमजा करण्यासाठी कार बाजारातील दुकानातून दोन मोटारींची चोरी केली. त्यांच्या ताब्यातून १० लाख ५० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारी जप्त केल्या आहेत. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT