पुणे

कुंडमळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

CD

तळेगाव स्टेशन, ता. २ : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे गुरुवारी (ता. २) सायंकाळी इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. साजीद शरीफ बागवान (वय २०, रा. निगडी, पुणे) आणि आतीक शरीफ बागवान (वय १५, रा. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. दोघे बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. टी. म्हस्के, हवालदार प्रशांत सोरटे, अंमलदार सुरेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळ्याच्या पथकाला शोधमोहीमेसाठी पाचारण करण्यात आले. नीलेश गराडे, प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर आदींनी नदीपात्रात उतरून दीड तास शोध घेतल्यानंतर साडेसातच्या सुमारास दोघांचे मृतदेह हाती लागले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत दोघे रस्त्याकडेला फळविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT