पुणे

कोविड-१९ वर सुई नसलेली इंट्रा-नोझल बूस्टर लस तयार

CD

पुणे, ता. २७ ः ‘इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड’ (आयआयएल) कंपनीद्वारे ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने कोडॉन डीऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून एसएआरएस-सीओव्ही- विरुद्ध लाईव्ह-एटेन्युएटेड सुई नसलेली इंट्रा-नोझल बूस्टर लस विकसित करण्यात आली आहे. कोविड-१९ लसीवरील हे महत्त्वपूर्ण काम सोमवारी (ता. २६) विज्ञान जर्नल ‘नेचर कम्युनिकेशन्स’ मध्ये प्रकाशित झाले आहे.
कोविड १९ चा धोका अजूनही संपलेला नाही. कोविड-१९ मुळे अजूनही जगभरात एका आठवड्यात सुमारे १ हजार ७०० लोकांचा बळी जात आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेतर्फे जोखीम असलेल्या लोकांना बूस्टरसह लसीकरण करत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोडोन डीऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली एसएआरएस-सीओव्ही- विरुद्ध लाईव्ह-एटेन्युएटेड सुई नसलेली इंट्रा-नोझल बूस्टर लस उल्लेखनीय स्थिरता दर्शवते. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासात ही लस सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
‘इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड’चे ​​व्यवस्थापकीय संचालक डॉ. के आनंद कुमार म्हणाले, ‘‘ही उपलब्धी म्हणजे कोविड-१९ विरुद्धच्या लढाईतील एक मोठे पाऊल आहे. या लसीचा विकास सार्वजनिक आरोग्यामधील नावीन्यपूर्णतेसाठीचे आमचे समर्पणच दर्शवत नाही, तर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आयआयएलची क्षमतादेखील दर्शवते. आमची अग्रगण्य इंट्रानोझल लस संसर्गजन्य आजारांविरुद्धच्या लढ्यात क्रांती घडवून आणण्यासाठी तयार आहे. लसीकरणाचा दर वाढविणे हे आमचे ध्येय आहे’’
‘इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड’चे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रियब्रता पटनाईक म्हणाले, ‘‘आमच्या रिलर्च आणि डेव्हलपमेंट समूहाने या नावीन्यपूर्ण लसीच्या निर्मितीसाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. या लसीच्या एका डोसने संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती निर्माण करून ही लस सुरक्षा प्रदान करते, याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT