पुणे

विद्येचे प्रांगण

CD

विद्येच्या प्रांगणात
़़
राधाकृष्णन प्रशालेत
स्नेहमेळावा उत्साहात
पुणे, ता. ३० : बोपोडी येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशालेत १९९७ व १९९८च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात महापालिका उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास पोखरकर हे होत. यावेळी रंजना टंकसाळे, दिलीप काटे, रजनी कर्णे, कमलाकर पाटील, वाल्मीक हजारे, सीताराम वाघ, देविदास सरोदे आदी शिक्षक उपस्थित होते. मेळावा यशस्वी होण्यासाठी विनायक घुले, सुप्रिया मोरे, घन:शाम मलगे, उमेश बहिरट, प्रिया परसे, संदीप पवळे, विकास गायकवाड, अमोल शेळके, कुणाल गंभिरे या माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
................
अमली पदार्थ विरोधी जागृती अभियान
पुणे, ता. ३० : रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी ज्युनिअर कॉलेज येथे अमली पदार्थ विरोधी जागृती अभियान आयोजित केले होते. कॅम्प एज्युकेशन सोसायटी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. डॉ. मिलिंद भोई यांनी अमली पदार्थ कोणते व अमली पदार्थांचे सेवन केल्यास होणारे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले.
............
हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहीहंडी
पुणे, ता. ३० : मुळशी तालुक्यातील कासार अंबोली गावातील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण आणि विविध पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका डॉ. रेणू पाटील यांच्या हस्ते श्री कृष्ण पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण नृत्य सादर केले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मिळून दहीहंडी फोडली. तसेच यानिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कृष्णा भिलारे, संगीता भिलारे, कुणाल भिलारे, यशस्विनी भिलारे व समिधा भिलारे आदी उपस्थित होते.
..........
सखी सावित्री समितीतर्फे व्याख्यान
पुणे, ता. ३० : सखी सावित्री समितीतर्फे ‘महिला लैंगिक अत्याचार संबंधित कायदे आणि माता व मुलींचे समुपदेशन’ या विषयावर ॲड सिद्धी जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाला हवालदार प्रीती भोसले आणि शिपाई लता शिंदे या दामिनी पथकातील पोलिस उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रशांत वाघ हे होते. उपमुख्याध्यापिका लता भोसले उपस्थित होत्या. उपस्थितांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर जोशी यांनी महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे त्यासंबंधी असलेले कायदे मुलींना आणि महिला पालकांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. समितीच्या समन्वयक शिक्षिका मीना साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. तर नजमा शाह यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT