Rohit Pawar
Rohit Pawar sakal
पुणे

Rohit Pawar : तावडे निर्णय घेत असल्याने फडणवीस घाबरले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असले तरी सर्व अधिकार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे जात आहेत. सर्व मोठे निर्णय तावडे घेत आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे राजकीय वजन कमी होत असून ते व त्यांचे समर्थक नेते घाबरले आहेत,’ अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी रविवारी टीका केली.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने पवार यांनी ‘महिला महाराष्ट्र प्रिमीयर लीग’ची रविवारी घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
उद्योजक प्रवीण माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याविषयी रोहित पवार म्हणाले, ‘‘माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे बरीच संपत्ती आहे. ते मनापासून गेले आहेत, की त्यांना मनाविरुद्ध नेले गेले आहे हे बघावे लागेल. नेते गेले तरीही जनता आमच्यासोबत आहे. सुप्रिया सुळे तीन लाखांच्या मताधिक्‍क्‍याने निवडून येतील.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘काही लोकांकडून महाराष्ट्राची तिजोरी पोखरण्याचे काम सुरु आहे, त्या लोकांचे काय ? लवकरच तिसरी फाइल उघडू. त्यातही मोठे गैरव्यवहार आहेत. विरोधकांकडे आता पैसे खूप झाले आहेत. २०० कोटी रुपयांचा मलिदा मिळाल्यामुळेच ते बेजबाबदार विधाने करीत आहेत.’’

खडसेंनाही तुरुंगात टाकतील
भाजपवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की, ‘‘एकनाथ खडसे यांच्या खूप अडचणी आहेत. भाजप खोट्या फाइल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकते. भाजपने खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. सध्या खडसे यांची प्रकृती ठिक नाही. अशा स्थितीतही भाजप त्यांना तुरुंगात टाकू शकते. भाजपने त्यांना ‘ब्लॅकमेल’ केले असावे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या फाइल काढून तुरुंगात टाकण्यात आले. तसाच ‘प्लॅन’ खडसे यांच्याबद्दलही त्यांनी केला असेल.’’

..तर पुण्यातही ‘आयपीएल’ होईल
‘‘पुण्याचा संघ नसल्याने आयपीएलचे सामने येथे होत नाहीत, पण अनेक राज्यांत सध्या पाण्याचा अभाव आहे. तिकडे सामने होतील की नाही हे माहिती नाही. मात्र आम्ही पुण्यात क्रिकेट सामने घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हे सामने होण्याची शक्‍यता आहे,’’ असेही पवार यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले
- खेकड्याबाबत ‘पेटा’कडून नोटीस आल्यास योग्य उत्तर देऊ
- मी परदेशात शिकलो नाही, मात्र संघर्षातून व अनुभवातून बरेच काही शिकलो
- प्रवीण दरेकर यांनी किती पक्ष सोडले, निष्ठेबद्दल त्यांनी काय बोलावे...
- दरेकर यांची बँक व ते सुखरूप आहे, हे महत्त्वाचे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT