पुणे

प्रलंबित प्रश्नांचे कोडे कसे सुटणार

CD

हडपसर विधानसभा मतदारसंघ

हडपसर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आणि समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा असे स्थानिक विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात जोर धरत आहेत. तसेच कचरा डेपोची दुर्गंधी हा प्रश्नही कायम असून हडपसर महापालिकेची या मतदारसंघात चर्चा सातत्याने सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर यांच्यासह १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मराठा, माळी आदी जातीय समीकरणांचीही जुळवाजुळव येथे सुरू आहे. या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसह पिण्याचे पाणी, कचरा प्रश्‍न, मेट्रो, वाहतूक कोंडीसह इतर प्रश्न सोडविण्यास प्राधान्यक्रम राहील, असे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे.

मतदारसंख्या
पुरुष : ३ लाख २८ हजार ८२
महिला : २ लाख ९७ हजार ५१५
तृतीयपंथी : ७८
एकूण : ६ लाख २५ हजार ६७५

प्रमुख समस्या
- पुणे-सोलापूर महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी
- कात्रज-कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील अपूर्ण कामे
- २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण
- समाविष्ट गावांमध्ये मैदाने, उद्याने, आरोग्य सुविधा, पथदिवे, वाहनतळ विकासकामांना गती देण्याची गरज
- कचरा डेपोची दुर्गंधी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हडपसर ते स्वारगेट आणि पुढे कात्रजपर्यंत तसेच, हडपसर ते खराडी अशा दोन मेट्रो मार्गांना मंजुरी मिळविण्यात यशस्वी झालो आहे. हडपसर-लोणी काळभोर मेट्रो मार्गाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने सुरू आहे. डीपी रस्ता, मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालय, आरोग्य सुविधा, उद्याने, मैदानांचा विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- चेतन तुपे पाटील, उमेदवार, महायुती- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

भामा आसखेडच्या धर्तीवर मुळशी धरणातून तीन टीएमसी पाणी आणण्यात येईल. २४ बाय ७ पाणीपुरवठा करण्यात येईल. हडपसर परिसर कचरा प्रकल्पमुक्त करण्यात येईल. हडपसर, मांजरी आणि कोंढवा खुर्द येथे क्रीडा संकुल उभारण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, पोलिस चौकींची संख्या वाढविण्यात येईल. वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य राहील.
- प्रशांत जगताप, उमेदवार, महाविकास आघाडी- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील. कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. हडपसर कचरा डेपोमुक्त करण्यात येईल. हडपसरला मेट्रो सुरू करण्यासह, डीपी रस्ता, पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येतील. मतदारसंघाच्या विकासासाठी हडपसर-हवेली स्वतंत्र महापालिका निर्माण करण्यास प्राधान्य राहील.
- साईनाथ बाबर, उमेदवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या बाजारात मोठा ट्विस्ट! 4 दिवसांत गेम बदलला; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Maratha Coins Discovery: मराठाकालीन दुर्मीळ नाणी सापडली; संगमनेर तालुक्यातील निमगावजाळीत ऐतिहासिक ठेवा, ‘छत्रपती’ असा उल्लेख..

Sangli Bribery Case : पती शिक्षक, पत्नी सरपंच; दोघांनाही 35 हजारांची लाच भोवली! ACB च्या कारवाईनंतर सांगली जिल्हा परिषद ॲक्शन मोडमध्ये...

Latest Marathi News Live Update : नालेसफाईतील गोलमाल उघड, गोराई परिसरात धक्कादायक प्रकार

Vastu Tips : घरात ज्या खोलीत झोपता तिथं चुकूनही ठेऊ नका 'या' ३ वस्तू; नाहीतर होईल पैशांची अडचण, सतत घडू लागतील नकारात्मक गोष्टी

SCROLL FOR NEXT