पुणे

डोक्‍यात दगड घालून बाणेरमध्ये मजुराचा खून

CD

पुणे, ता. १० ः मजुराच्या डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना बाणेरमध्ये सोमवारी सकाळी उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाना विठ्ठल चादर (वय ३६, रा. वाकड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ सचिन (वय ३४) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नाना बाणेर परिसरातच मजुरी करायचा. त्याला मद्याचे व्यसन होते. दोन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. सोमवारी सकाळी धनकुडे वस्ती भागात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर सचिन यास कळविण्यात आले. खुनाच्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी सांगितले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

SCROLL FOR NEXT