पुणे

महापालिका रुग्णालयांना डॉक्‍टर देता का डॉक्‍टर?

CD

पुणे, ता. २० : खासगी रुग्‍णालयांच्‍या तुलनेत मिळणारा अपुरा पगार, कंत्राटी सेवा, रुग्‍णांची वाढती संख्‍या, अपुरी वैद्यकीय उपकरणे व रुग्‍णालयीन कामाच्‍या बरोबरच प्रशासकीय कामाचा ताण या कारणांमुळे, महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाला ‘कुणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर’ असे म्‍हणण्‍याची वेळ आली आहे.

महापालिकेचे नायडू सांसर्गिक रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालयासह २१ प्रसूतिगृह आणि ५१ दवाखाने आहेत. या रुग्णालयांमधील वर्ग ‘अ’च्या १४४ मंजूर पदांपैकी तब्‍बल १०५ पदे रिक्त आहेत तर, अवघ्या ३९ डॉक्‍टरांवर संपूर्ण भार आहे. याबाबत वारंवार जाहिरात देऊनही या पदांवर काम करण्‍यासाठी कोणी तयार होत नाही. यात तज्‍ज्ञांच्‍या जागा मोठ्या प्रमाणात रिक्‍त आहेत. त्‍यामध्‍ये मेंदू व मज्जासंस्थेवरील शस्त्रक्रिया तज्ज्ञ (न्यूरोसर्जन), मेंदू, मज्जासंस्था यांचे निदान व औषधोपचार करणारा तज्ज्ञ (न्युरोफिजिशियन), मूत्रमार्गशल्‍यचिकित्‍सक (युरोसर्जन), ह्रदयविकारतज्‍ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) यांचे प्रत्‍येकी एक पद रिक्‍त आहे. फुप्‍फुसविकारतज्ज्ञ तीन (चेस्ट फिजिशियन), अतिदक्षता विभाग तज्ज्ञ चार, अत्‍यवस्‍थ रुग्‍णांवर उपचार करणारे इन्‍टेन्सिव्हिस्टच्‍या तीन, स्त्रीरोगतज्ज्ञ आठ, बालरोगतज्ज्ञ चार, क्ष-किरणतज्ज्ञ १६, बालशस्‍त्रक्रियातज्ज्ञ चार, मानसोपचारतज्ज्ञ दोन, त्वचारोगतज्ज्ञ एक आदी डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्ण विशेषोपचारांपासून वंचित राहत आहेत.

महापालिकेत नव्याने गावे समाविष्ट झाल्यानंतर लोकसंख्येचा भार वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत रुग्णालयांमधील मनुष्यबळ वाढलेले नाही. वर्ग ‘१’ मधील ७२ टक्के पदे, वर्ग ‘२’ मधील ७० टक्के आणि वर्ग ‘३’ मधील ६९ टक्के पदे रिक्त आहेत. कमला नेहरू रुग्णालयात अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि विद्यार्थी आरोग्य सेवेसाठी हजर असले तरी त्यांच्याकडून उपचार केले जात नाहीत. रुग्णालयांमध्ये मोजकेच डॉक्टर अनेक रुग्णांची जबाबदारी सांभाळत आहेत. परिणामी, उपलब्ध डॉक्टरांवर ताण वाढला आहे.

याबाबत महापालिकेच्‍या आरोग्‍य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्‍हणाल्‍या की, ‘‘महापालिका हद्दीमध्ये वाढ झालेली असल्याने लोकसंख्‍या वाढली असून त्‍याचा ताण येत आहे. शासनमान्य नियुक्तीच्या आकृतिबंध २०१४ मधील विविध संवर्गातील पदसंख्येमध्ये वाढ करण्यासंदर्भात मागणी केली आहे.’’

वर्ग - मंजूर पदे - भरलेली पदे - रिक्त पदे
वर्ग १ - १४४ - ३९ - १०५
वर्ग २ - २६५ - १८६ - ७९
वर्ग ३ - ७५८ - ५४३ - २५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Putin Visit to India: भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर' सुरू असताना, चार वर्षानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येताय दिल्लीत!

Sanju Samson : मोठी बातमी! संजू सॅमसन CSK त जाण्याच्या तयारीत...संघ व्यवस्थापनाकडे केली 'ही' मागणी; राजस्थानच्या रॉयल्सच्या गोटात नेमकं काय शिजतंय?

Viral Video: सोंडेत धरला ब्रश अन् हत्तीनेच काढलं हत्तीचं चित्र; जराही रेष इकडे-तिकडे नाही, सोशल मीडियात हुशार हत्तीचं होतंय कौतुक

Latest Maharashtra News Updates: नारळी पौर्णिमेच्या सुट्टीमुळे परीक्षा अचानक रद्द

SCROLL FOR NEXT