पुणे

स्मार्ट सिटीबाबत भाजपने पुणेकरांना फसविले ः मोहन जोशी

CD

पुणे, ता. १० ः ‘‘स्मार्ट सिटी योजनेत संपूर्ण शहर स्मार्ट होणे तर दूरच राहिले, मात्र अगोदरच विकसित असलेला परिसरदेखील स्मार्ट होऊ शकला नाही. आता तर स्मार्ट सिटी योजनाच बंद पडली आहे. त्यामुळे भाजपने स्मार्ट सिटी करण्याचे पुणेकरांना दिलेले आश्‍वासन पूर्ण न करता फसवणूक केली आहे,’’ अशी टीका माजी आमदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील अनेक प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर जोशी यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. जोशी म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० शहरे ‘स्मार्ट सिटी’ करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश होता. पहिल्या टप्प्यासाठी बाणेर, बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. या भागात ही योजना अपयशी ठरली आहे. निवडणुकांमध्ये भाजप नेत्यांनी पुणेकरांना मोठमोठी आश्‍वासने दिल्याने पुणेकरांनी त्यांना मतदान केले. आता मात्र स्मार्ट सिटीची कुठलीही उद्दिष्टे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे भाजपने पुणेकरांची फसवणूक केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT