पुणे

संरक्षण तंत्रज्ञानात ‘मायनर डिग्री’ अभ्यासक्रम

CD

पुणे, ता. १० : देशातील युवकांना संरक्षणविषयक नवोन्मेषासाठी (इनोव्हेशन) आणि स्वदेशी क्षमतांचा विस्तार वाढविण्यासाठी आता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एक पाऊल पुढे टाकले आहे. संरक्षण क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील ‘मायनर डिग्री अभ्यासक्रमासाठी ‘एआयसीटीई’ने आता ‘मॉडेल’ अभ्यासक्रम जाहीर केला आहे. भारताला संरक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर महासत्ता बनवायचे असेल तर या क्षेत्रातील सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे ‘एआयसीटीई’ने अधोरेखित केले.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानात संरक्षण तंत्रज्ञानातील ‘मायनर डिग्री’चा नमुना अभ्यासक्रम जाहीर केल्याची माहिती ‘एआयसीटीई’ने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळकटी देत भारत सध्या संरक्षण क्षेत्रात मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल, नवोन्मेषी युवक घडविण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
एरोनॉटिकल सिस्टिम्स, नौदल तंत्रज्ञान, शस्त्र प्रणाली, सायबर सुरक्षा, ॲडव्हान्स मेटेरियल्स यांसारखे विषय संरक्षण तंत्रज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमातून विद्यार्थी केवळ आपल्या व्यावसायिक संधींमध्ये वाढ करणार नाहीत, तर देशाच्या एका महत्त्वपूर्ण उद्दिष्टासाठी लक्षणीय योगदान देतील. देशातील अव्वल असणाऱ्या २०० उत्कृष्ट तंत्र शिक्षण संस्थांनी पुढाकार घेऊन हा अभ्यासक्रम सक्रियपणे राबवावा, असे आवाहनही डॉ. सीताराम यांनी केले आहे. हा अभ्यासक्रम संरक्षण दल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि संरक्षण उत्पादन उद्योगांच्या गरजांशी सुसंगत हा बहुविद्याशाखीय नवोन्मेषावर भर देणारा असल्याचे ‘एआयसीटीई’ने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने संरक्षण तंत्रज्ञानात ‘मायनर डिग्री अभ्यासक्रम नव्याने सुरू केला आहे. याअंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अशा अभियांत्रिकी शाखांतून अभ्यास करणारे विद्यार्थी १८ क्रेडिटचा संरक्षण तंत्रज्ञानातील ‘मायनर डिग्री अभ्यासक्रम करू शकतात. अर्थात ते त्याच्या मूळ शाखेतील अभियंते म्हणूनच असतील. परंतु संरक्षण तंत्रज्ञानातील ‘मायनर डिग्री’देखील केलेली असेल, असे त्याचे स्वरूप आहे. अशा पद्धतीने अंतराळ तंत्रज्ञानातही ‘मायनर डिग्री’ अभ्यासक्रम ‘एआयसीटी’ने आधीच सुरू केला आहे. आता संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना ‘मायनर डिग्री’ आणि एम.टेक अभ्यासक्रम करता येणार आहेत,’’ अशी माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी दिली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : बाजारात इलेक्ट्रिक दुचाकीं खरेदीकडे नागरिकांचा कल

SCROLL FOR NEXT