पुणे

यंदा पीक कर्जवाटपात ९०० कोटींची घट जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ८५ टक्केच कर्जाचे वाटप

CD

पुणे, ता. १० ः जिल्ह्यात खरीप हंगामात पाच कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ४ हजार २८९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ८५ टक्केच पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षी उद्दिष्टाच्या ११० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. तर त्या तुलनेत यंदा कर्जवाटपात सुमारे ९०० कोटींची घट झाली आहे.
पुणे जिल्हा बँकर्सची जिल्हा सल्लागार समिती आणि जिल्हास्तर आढावा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यातून ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात २०२४ मध्ये खरीप हंगामाचे पीककर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी देण्यात आले होते. किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबरअखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून, ११६ टक्के लक्ष्य गाठले होते. यंदा उद्दिष्टात सुमारे ६४६ कोटी रुपयांची वाढ करून एकूण उद्दिष्ट ५ हजार कोटींचे देण्यात आले होते. आतापर्यंत जिल्हा, सहकारी व खासगी बँकांनी मिळून ४ हजार २८९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली.
एकूण वाटप झालेले कर्ज गेल्या वर्षाच्या वाटपाच्या तुलनेत यंदा कर्ज वाटपात सुमारे ९०० कोटींची घट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदा कर्ज नवे जुने केलेले नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र, ती प्रत्यक्षात अमलात आलेली नाही. तरीही काही शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याने पीककर्ज वाटप तुलनेने कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
पीककर्ज घेतल्यापासून वर्षभरात त्याची परतफेड केल्यास एकूण सात टक्के व्याजमाफी मिळते. त्यात केंद्र सरकारकडून ३ टक्के तर राज्य सरकारकडून ४ टक्के व्याजात सवलत मिळते. शेतकऱ्यांनी व्याज सवलतीचा लाभ घेण्यासाठी परतफेड वेळेत करावी, असे आवाहनही पाटील यांनी केली.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT