पुणे

सराईत गुन्हेगाराकडून ३८ मोबाईलसह तीन दुचाकी जप्त

CD

पुणे, ता. २८ : शहरात मोबाईल चोरी व जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली. यात पोलिसांनी ३८ मोबाईल, तीन दुचाकी आणि जबरी चोरीच्या दोन घटनांची उकल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्चला पहाटे साडेतीनच्या सुमारास फिर्यादी हडपसर येथे भाजी मंडईत रिक्षाची वाट पाहत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार तपास पथक कार्यरत होते. तपासादरम्यान आरोपी विकास ऊर्फ आकाश सुरेश वाघिरे (वय २१, रा. शिवाजीनगर, पुणे) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
चौकशीत आरोपींनी हडपसर, लोणीकाळभोर, खडकी, चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले. आरोपींकडून ३८ मोबाईल आणि तीन दुचाकी जप्त केल्या असून, मुद्देमालाची किंमत पाच लाख २० हजार रुपये आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'Vaping'चा वाद अन् पेटला रियान पराग! ८ चौकार, ५ षटकारांसह कुटल्या ९० धावा... राजस्थान रॉयल्सने उभे केले तगडे लक्ष्य

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT