पुणे

महिलांमधील कर्करोगात भविष्‍यात वाढ

CD

पुणे, ता. ९ : जीवनशैलीतील बदल आणि पर्यावरणीय घटकांमुळे महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख, यकृत कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्‍याचे ‘आयसीएमआर’च्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे वाढते प्रमाण चिंताजनक असले तरी वेळीच निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे कर्करोगावर मात करणे शक्य असून जीवनमान सुधारू शकते, असे तज्‍ज्ञांचे मत आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) याबाबतचा केलेला अहवाल प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्‍यानुसार गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि भविष्यात हा दर वाढतच राहील, असे भाष्‍य करण्यात आले आहे. यामध्‍ये महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका असला तरी, इतर कर्करोगाचेही प्रमाण वाढत आहे. यानुसार २०२२ ते २०५० दरम्यान मृत्युदर ६४.७ वरून १०९.६ पर्यंत वाढण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांत ३५ ते ६५ वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत असून स्तन, थायरॉईड, फुफ्फुस आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग अधिक सामान्‍य होत आहे. तळेगाव येथील ‘ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर’च्या (२०२३-२०२५) आकडेवारीनुसार, २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ३० ते ४० वयोगटात १५.९ टक्के, ४०-५० वयोगटात २७ टक्के, ५० ते ६० वयोगटात २८.६ टक्के तर ६० ते ७० वयोगटातील १४.३ टक्के महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल यांनी दिली.

जगण्याचा दर आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे. सामान्य फुफ्फुसाच्या कर्करोगाचा जगण्याचा दर पाच वर्षे म्हणजेच ६१ टक्के इतका आहे. मात्र तो जेव्हा इतर अवयवांमध्ये पसरतो तेव्हा त्या व्यक्तीचा जगण्याचा दर सात टक्के इतका कमी होतो. कर्करोगाच्या उपचारांत विलंब झाल्यास मृत्युदरात वाढ होते.
- डॉ. गौरव जसवाल, कर्करोगतज्ज्ञ

काय आहेत उपाय
- कर्करोग रोखण्यासाठी महिलांनी संतुलित आहाराचे सेवन करावे, दररोज व्यायाम करावा, वजन नियंत्रित ठेवावे
- अल्कोहोलचे सेवन मर्यादित करावे, तंबाखू आणि इतर कर्करोगजन्य घटक टाळावेत
- नियमित तपासणीमुळे कर्करोगाचे वेळीच निदान करता येते व उपचार करता येतात
- स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा आणि गुदद्वाराच्या कर्करोगांसाठी तपासणी तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल आणि मधुमेहाची तपासणी करा
- एचपीव्ही लसीकरण हे गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करण्‍यासाठी उपयुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT