पुणे

अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करा

CD

पुणे, ता. १२ ः ‘इफ्को’च्या नॅनो खतांच्या विक्रीबाबत अधिकृत न केलेल्या तसेच केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशानुसार बंधनकारक केलेली प्रमाणपत्रे धारण न करता ऑनलाइन पद्धतीने इफ्कोच्या नॅनो खतांची विक्री कमी दराने बेकायदा होत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांची व विक्रेत्यांची दिशाभूल होत असून, अशा ऑनलाइन विक्री करणाऱ्यांविरुद्ध ‘इफ्को’कडून आता कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ‘इफ्को’ची खते अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत, असे आवाहन ‘इफ्को’कडून करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशाप्रमाणे विहित ‘ओ’ प्रमाणपत्रधारकांनाच या प्रकारातील खतांची विक्री करता येते. मात्र तरीही काही ऑनलाइन पातळीवर अशा प्रकारचे कुठलेही प्रमाणपत्र नसताना आणि ‘इफ्को’ने प्राधिकृत केलेले नसतानाही अत्यल्प साठा बाजारातून खरेदी करून किंवा इतर मार्गांनी प्राप्त करून घेऊन अवास्तव दरात विक्री करून ऑनलाइन ग्राहक आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. हे पूर्णपणे बेकायदा आहे, असे इफ्कोने म्हटले आहे.

नॅनो खतांचे इफ्कोने अधिकृत केलेले निश्‍चित दर (जीएसटीसह)
नॅनो युरिया : विक्रेत्यास विक्री दर - २०४ रुपये प्रति ५०० मिली बॉटल
शेतकऱ्यांना विक्रीसाठी जास्तीत जास्त दर - २२५ रुपये प्रति ५०० मिली बॉटल
नॅनो डीएपी : विक्रेत्यास विक्री दर - ५४७.५० रुपये प्रति ५०० मिली बॉटल
शेतकऱ्यांना विक्रीसाठी जास्तीत जास्त दर - ६०० रुपये प्रति ५०० मिली बॉटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT