पुणे

दत्तात्रेय गाडेची येरवडा कारागृहात रवानगी

CD

पुणे, ता. १२ ः स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला याप्रकरणी अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. बुधवारी (ता. १२) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिस कोठडीदरम्यान गाडे याला या गुन्ह्यातील घटनास्थळांवर नेण्यात आले होते. तो ज्या शेतात लपून बसला होता, त्या शेताची पाहणी करून पुरावा गोळा करण्यात आला. या दरम्यान तो ज्यांना-ज्यांना भेटला त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. गाडेला न्यायालयात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने बुधवारी परिसरात चोख बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडेची न्यायालयीन कोठडी मागण्यासंबंधी अहवाल न्यायालयात सादर केला. या वेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला कपडे पुरविण्याची मागणी केली. आरोपीचे वकील सुमीत पोटे यांनी न्यायालयाकडे न्यायालयातच आरोपीशी बोलण्याची संधी मिळण्याची मागणी केली. गाडेच्या वतीने अ‍ॅड. वाजेद खान-बिडकर यांनीदेखील बाजू मांडली, तर मूळ फिर्यादी यांच्या वतीने असीम सरोदे यांनी बाजू मांडली.

अद्यापही मोबाईल मिळेना
घटनेच्या दिवशी गाडेकडे जो मोबाईल होता, त्याचा शोध घेण्यात येत आहे. हा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

आतापर्यंत तपासात काय झाले?
- घटनास्थळांचा पंचनामा
- तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला
- प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी
- आरोपी आणि तरुणीचे कपडे जप्त
- सायंटिफिक विश्‍लेषणासाठी कपडे पाठवले
- आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले
- गाडेवर एकूण सात गुन्हे दाखल असल्याची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

Latest Marathi News Live Update: अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

SCROLL FOR NEXT