पुणे

जिल्हा नियोजन दीडशे कामांत फेरबदल

CD

पुणे, ता. १८ : जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांमध्ये फेरबदल केला जात आहे. आत्तापर्यंत दीडशेहून अधिक कामे ही बदल प्रस्तावांद्वारे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. कामात बदल करण्याची कारणेही प्रस्तावात देण्यात आली आहेत.
मागील महिनाभरात कामे बदल करण्याचा धडाका सुरू आहे. जनसुविधा आणि इतर लेखाशीर्षमधील कामे वैधानिक प्रक्रिया बाजूला ठेवून बदल प्रस्तावाद्वारे मंजूर केली जात आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे कामांची यादी पाठविण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेचे आहेत. मुख्य म्हणजे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने शिफारस केलेल्या कामांनाच जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी दिली जाते. या कामांमध्ये बदल करायचा झाल्यास पुन्हा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची शिफारस आणि जिल्हा नियोजन समितीची मंजुरी आवश्यक आहे. गावपातळीवर काम करताना अडचणी येतात, मात्र निधी उपलब्ध असल्याने कामाची जागा बदलली जाते. परिणामी निधी मागे न जाता तो गावच्या विकासासाठी उपयोगी पडतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीने पुस्तिकेमध्ये मंजूर केलेल्या कामांची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली.
आत्तापर्यंत सुमारे १८० ते १९० कामे बदल प्रस्तावामध्ये मंजूर करण्यात आली आहेत. कामात बदल केल्याने काही लोकप्रतिनिधींनी यावर हरकतीही घेतल्या आहेत. या कामांना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची शिफारसही नाही. तसेच प्रस्ताव बदलले जात असल्यामुळे वैधानिक प्रक्रियाच पाळली जात नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT