पुणे, ता. १८ : सदनिकेचा ताबा न देता आर्थिक फसवणूक केली, तसेच जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अक्षय संजय शिंदे (रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. वीरेंद्रसिंह जाधवराव, शिवतेज रामदास बिबवे आणि सचिन बाळकृष्ण सरकाळे अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी २०२२ मध्ये येवलेवाडीतील एका गृहप्रकल्पात सदनिका खरेदी केली होती. त्यासाठी दस्तनोंदणी करून बॅंकेतून कर्ज उचलून संपूर्ण रक्कम भरली, परंतु सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. चौकशीदरम्यान, ही सदनिका जमिनीच्या मूळ मालकाच्या नावे विकसनाच्या मोबदल्यापोटी करण्यात आल्याचे समोर आले. याबाबत विचारणा केली असता तिघांनी सदनिकेचा ताबा न देता जातिवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आर्थिक फसवणूक, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.