पुणे, ता. ३१ ः शहरासह उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. रविवारी सकाळी काही वेळ ऊन होते तर दिवसभर हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण होते. पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून, घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शहरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाला सुरवात झाली होती. पण सध्यातरी पावसाचा जोर कमी झाला आहे. दिवसभरात मगरपट्टा भागात एक मिलिमीटर, हडपसर भागात ०.५ मिलिमीटर आणि शिवाजीनगर भागात ०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने व्यक्त केली आहे. तसेच कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २१.९ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.