पुणे

पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडांना अटक

CD

पुणे, ता. २६ : सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या दोन तडीपार गुंडांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गणेश गौतम वाघमारे (वय २८) आणि तेजस काशिनाथ शेलार (वय २५, दोघे रा. दांडेकर पूल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलिस ठाण्यातून ‘मकोका’मधून सुटलेला आरोपी गणेश वाघमारे हा हातात पिस्तूल घेऊन दांडेकर पूल परिसरात सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवीत असल्याची माहिती हवालदार राजेंद्र लांडगे, शिपाई अमर पवार, मयूर भोकरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वाघमारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तुलाबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र तेजस शेलार याने पिस्तूल विकत आणल्याचे सांगितले. आमच्या सुरक्षिततेसाठी पिस्तूल जवळ ठेवत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी तेजसकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केले.
दरम्यान, दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के (रा. दांडेकर पूल) व रोशन अविनाश काकडे (रा. तुकाईनगर, सिंहगड रोड) हे दोघे धारदार शस्त्रांसह पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना अटक करून कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांकडे असतो ज्ञानाचा खजिना; पण दुसऱ्यांना देतात चुकीची माहिती, यांच्यापासून रहा सावध

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT