पुणे

राज्यात पावसाचा ‘यलो’ अलर्ट

CD

पुणे, ता. ९ : उन्हाळ्याच्या तडाख्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणामध्ये शनिवारी (ता. १०) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून, या भागांसाठी पुढील दोन दिवस ‘यलो’ अलर्ट लागू करण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असल्यामुळे तीन ते चार दिवसांसाठी ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे; तर विदर्भात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने पुढील चार ते पाच दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये पुढील दोन दिवस कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा सायंकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच ते सात दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 5th Test: भारताने इंग्लंडविरुद्ध थरारक विजय मिळवत मालिका वाचवली! मोहम्मद सिराज - प्रसिद्ध कृष्णा ठरले हिरो

Toll Plaza: केवळ पंधरा रुपयांमध्ये पार करा टोल प्लाझा; 'या' वाहनांना मिळणार मुभा, केंद्राचं मोठं पाऊल

Pune News : पोलिसांकडून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा तरुणींचा आरोप; संबंधितांवर कारवाई करण्याची रोहित पवार यांची मागणी

Muslim Headmaster: खळबळजनक! मुस्लिम मुख्यध्यापकास शाळेतून हटवण्यासाठी चक्क पाण्याच्या टाकीतच मिसळले विषारी रसायन

काजोल अचानक इतकी गोरी कशी झाली? स्वतः सांगितलं कारण; म्हणाली, 'ते काम करणं बंद केलं आणि...'

SCROLL FOR NEXT