पुणे

दहावीतही कोकण विभाग अव्वल

CD

पुणे, ता. १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४६ हजार ५७९ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के असा सर्वाधिक असून, सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी कमी झाला आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार २० नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ उपस्थित होते.
राज्यातील २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी चार ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, चार लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तीन लाख ६० हजार ६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, एक लाख आठ हजार ७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

तपशील : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : उत्तीर्णतेची टक्केवारी
नियमित विद्यार्थी : १५,४६,५७९ : १४,५५,४३३ : ९४.१०
खासगी विद्यार्थी : २८,०२० : २२,५१८ : ८०.३६
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी : २३,९५४ : ९,४४८ : ३९.४४
एकूण विद्यार्थी : १५,९८,५५३ : १४,८७,३९९ : ९३.०४

निकालाची वैशिष्ट्ये
- ९२.२७ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
- एकूण ६२ विषयांची परीक्षा; २४ विषयांचा निकाल १०० टक्के
- १०० टक्के निकालाच्या शाळा : ७,९२४
- शून्य टक्के निकालाच्या शाळा : ४९
- सवलतीचे गुण मिळालेले विद्यार्थी : २,४६,६०२
- ‘एटीकेटी’लागू असलेले विद्यार्थी : ३४,३९३
- निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी : ०४

गेल्या चार वर्षांतील निकालाची टक्केवारी
वर्ष : उत्तीर्णतेची टक्केवारी
२०२२ : ९६.९४ टक्के
२०२३ : ९३.८३ टक्के
२०२४ : ९५.८१ टक्के
२०२५ : ९४.१० टक्के

विभागनिहाय निकालाची टक्केवारी
विभाग : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : ९४.८१
नागपूर : ९०.७८
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२
मुंबई : ९५.८४
कोल्हापूर : ९६.८७
अमरावती : ९२.९५
नाशिक : ९३.०४
लातूर : ९२.७७
कोकण : ९८.८२

नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची आकडेवारी
तपशील : मुले : मुली : एकूण


नोंदणी केलेले : ८,३०,३०९ : ७,२७,७११ : १५,५८,०२०
परीक्षा दिलेले : ८,२३,६११ : ७,२२,९६८ : १५,४६,५७९
उत्तीर्ण झालेले : ७,६०,३२५ : ६,९५,१०८ : १४,५५,४३३
उत्तीर्णतेची टक्केवारी : ९२.३१ टक्के : ९६.१४ टक्के : ९४.१० टक्के

टक्केवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
टक्केवारी : विद्यार्थ्यांची संख्या
९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ८१,८०९
८५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,११,८७८
८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,३९,७७४
७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,५६,३७५
७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,६२,९५२
६५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,६३,०२६
६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक : १,७६,४५९
४५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक : ३,७१,८२०
४५ टक्क्यांपेक्षा कमी : १,२३,२९९
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day: शनिवार वाड्यावर कोणी फडकवला होता तिरंगा?फुकट चहा ते थिएटरमध्ये नारळ,15 ऑगस्ट 1947 ला पुणेकरांचा जल्लोष!

स्कुबा डायव्हिंग करताना अंकिता वालावलकरला झाली दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'नाकातून रक्त येयला लागलं आणि...'

Latest Marathi News Live Updates : कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी शेतातच तिरंगा फडकावला

Pandit Nehru Speech Video : भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिन भाषणात काय बोलले होते पंडित नेहरू? व्हिडिओ पाहून म्हणाल जय हिंद!

Video : काळीज पिळवटणारी घटना! धोधो पाऊस अन् चालत्या गाड्यांवर कोसळलं झाड; जाग्यावर लोकांचा मृत्यू, धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT