पुणे, ता. १३ : राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात तब्बल २११ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. यंदा शंभर टक्के गुण मिळविणारे ११३ असे सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागात आहेत. तर राज्यातील ८१ हजार ८०९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत जवळपास १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते, त्यात लातूर विभागातील १२३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. यंदा राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे - १३, नागपूर- ०३, छत्रपती संभाजीनगर -४०, मुंबई - ०८, कोल्हापूर -१२, अमरावती -११, नाशिक - ०२, लातूर - ११३ आणि कोकण - ०९ विद्यार्थ्यांना विभागीय मंडळात १०० टक्के गुण मिळाले आहेत.
२८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के
३५ टक्के गुण मिळविणारे विभागनिहाय विद्यार्थी : पुणे-५९, नागपूर- ६३, छत्रपती संभाजीनगर- २८, मुंबई-६७, कोल्हापूर-१३, अमरावती-२८, नाशिक-०९, लातूर- १८, कोकण-००
राज्यातील ३३.७२ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के
राज्य मंडळामार्फत घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल २३ हजार ४८९ माध्यमिक शाळांमधील सात हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या शतकी खेळीसह शाळांच्या १०० टक्के निकालाचाही टक्का वाढत आहे. पुणे (१,३११), नागपूर (७३६), छत्रपती संभाजीनगर (६८७), मुंबई (१,५७९), कोल्हापूर (१,११४), अमरावती (७८९), नाशिक (७७७), लातूर (४४६), कोकण (४८६)
शंभर टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाही. कला, क्रीडा, एनसीसी आणि स्काउट गाइडचे सवलतीच्या गुणांची बेरीज होऊन हे गुण मिळाले आहेत.
- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.