पुणे

शिस्त हरवली अन् जीव गेले !

CD

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २० : रस्त्यावर शिस्त हरवली आणि बळी पडले निष्पाप जीव... वाहतुकीचे नियम हे शिस्तीचे नव्हे तर सुरक्षिततेचे कवच आहेत, पण सध्या बहुतांश वाहनचालकांना ते बंधन वाटू लागले आहेत. वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांत कारवाईत तिपटीहून अधिक वाढ झाली, तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. नियम तोडणे फक्त चुकीचेच नाही, तर जीवघेणेही ठरत असल्याचेच आकडेवारीवरून समोर आले आहे.

शहरात २०२३ मध्ये ९४१ प्राणांतिक अपघात झाले होते. यात ३५१ जणांचा मृत्यू झाला, तर ६९५ जण गंभीर जखमी झाले. त्याच तुलनेत २०२४ मध्ये अपघातांची संख्या ९९३ वर पोहोचली, म्हणजेच अपघातांत पाच टक्के वाढ झाली. मृतांची संख्या थोडीशी घटून ३४५ झाली असली, तरी गंभीर जखमींची संख्या ७४५ पर्यंत गेली. ती २०२३ च्या तुलनेत ५० ने अधिक आहे. २०२५ मध्ये केवळ मार्चअखेर १७२ अपघात झाले असून, त्यात ६२ जणांचा मृत्यू आणि ११३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा कल कायम राहिला, तर यंदा अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहर वाहतूक शाखेकडून कारवाई
(दोन वर्षांतील तुलनात्मक आकडेवारी, एप्रिलअखेर) :

नियमभंगाचा प्रकार- वर्ष २०२४- वर्ष २०२५ (एप्रिलअखेर)- वाढ (टक्केवारी)
ट्रिपल सीट १०,८८६ २१,३७९ +९६ टक्के
वन वे/नो एंट्री उल्लंघन १३,९३७ २,१२,१५७ +१४०० टक्के
विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ७,५७३ ५,११९ -३२ टक्के
धोकादायकरीत्या वाहन चालवणे ३९४ १,२४३ +२१५ टक्के
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे ३९४ १,६०९ +३०८ टक्के
वाहन चालवताना मोबाईलचा वापर ८,२९६ १३,६४६ +६४ टक्के
प्रिंटेड ग्लास वापरणे ४,४९४ ५,५९६ +२५ टक्के
सिग्नलचे उल्लंघन २८,२९९ ५८,५५७ +१०७ टक्के

काय सांगते आकडेवारी?
१) ‘नो एंट्री’चे उल्लंघन आणि ‘ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणांमध्ये तिपटीने वाढ
२) सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत सुमारे दुपटीने वाढ झाली
३) हे आकडे शहरातील वाहतूक शिस्तीची माहिती देण्यासाठी पुरेसे आहेत
४) वाहतूक पोलिसांच्या वाढत्या कारवायांमुळे नियमभंग थांबतील, अशी अपेक्षा होती
५) प्रत्यक्षात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे आढळते

पायाभूत सुविधांची गरज :
नागरिकांच्या शिस्तीबरोबरच शहरात महापालिका, ‘पीएमआरडीए’कडून वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा विकास, रस्त्यांची योग्य रचना, पथदिवे, सिग्नल यंत्रणांची सुधारणा अशा विविध उपाययोजनांचीही गरज आहे. तसेच, प्राथमिक शालेय स्तरापासूनच वाहतूक शिक्षण अनिवार्य करण्याची गरज आहे.

मद्य सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे या बाबी स्वत: आणि इतरांसाठीही धोकादायक आहेत. हा केवळ दंडात्मक कारवाईचा विषय नाही, तर आयुष्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. प्रत्येकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

- अमोल झेंडे,
पोलिस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा

तुमचे मत मांडा..
वाहन चालविताना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यासाठी जनजागृतीचीही गरज आहे. याबाबत तुमचे मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT