बुधवार पेठेत खुनाचा प्रयत्न
पुणे, ता. १८ : आइस्क्रीम खाताना झालेल्या किरकोळ वादातून एकाच्या डोक्यात वीट मारून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार पेठेत घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विनोद अप्पाराव माने (वय ३५, रा. गुरुजी तालीम गणपती मंदिराजवळ, बुधवार पेठ) आणि चिराग भजनलाल निमगावकर (वय ३५, रा. शोनान सोसायटी, नवी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाणीत किशोर चंद्रकांत काळेबेरे (वय ५८, रा. गणेश पेठ, लक्ष्मी रस्ता) यांना गंभीर दुखापत झाली आहे. काळेबेरे बुधवारी (ता. १५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरील हुतात्मा चौकात गाडीवर आइस्क्रीम खात थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून डोक्यात वीट मारली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत काळेबेरे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चेष्टा मस्करीत झालेल्या वादातून मित्रावर गोळीबार
पुणे, ता. १८ : मोबाईलवर गेम खेळत असताना चेष्टा मस्करीत झालेल्या वादातून एकाने मित्रावर गोळीबार केला. त्यात मित्र जखमी झाला असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना सिंहगड कॅम्पस परिसरात जंबो बिअर शॉपीसमोरील मैदानावर बुधवारी (ता. १५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
करण भारत गजरमल (वय १९, रा. आंबेगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गजरमल याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीलेश ऊर्फ बाब्या संतोष जाधव (वय २१, रा. आंबेगाव) याला अटक केली आहे.
करण व नीलेश हे दोघे मित्र मोबाईलवर गेम खेळत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात चेष्टा मस्करीतून वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात नीलेशने गावठी पिस्तुलातून करणवर गोळी झाडली. करणच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.