पुणे

जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून चारशे मुलांना श्रवणयंत्र

CD

पुणे, ता. १३ : आरोग्य तपासणीत श्रवणदोष आढळलेल्या ४१० विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र देण्यात आले. यासाठी औद्योगिक क्षेत्राचा सामाजिक जबाबदारीचा (सीएसआर) निधी वापरण्यात आला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) आणि समग्र शिक्षण अभियानातील विशेष शिक्षकांमार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. यात तीन ते १४ वयोगटांतील श्रवणदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आणि अ‍ॅटॉस इंडिया कंपनीच्या ‘सीएसआर’मधून हे श्रवणयंत्र वितरण झाले. स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या तांत्रिक सहकार्याने श्रवणयंत्र वितरण शिबिर घेण्यात आले. यात श्रवणतज्ज्ञ, डॉक्टर, विशेष शिक्षक आणि स्वयंसेवक यांनी एकत्र येऊन प्रत्येक मुलांची तपासणी केली. त्यानंतर श्रवणदोषाची तीव्रता तपासून त्यांना अनुरूप असे डिजिटल श्रवणयंत्र बसवण्यात आले. ही सर्व यंत्रे आणि संबंधित सेवा पूर्णपणे विनामूल्य पुरवण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, ‘‘शासकीय संस्था, खासगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन काम केले, तर समाजात खरा आणि शाश्वत बदल घडवता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या माध्यमातून या मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या या उपक्रमाचा भाग झाल्याचा अभिमान आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT