पुणे

वीस विमानतळांसाठी नवीन मार्गदर्शन सूचना

CD

पुणे, ता. २४ ः सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यासह देशातील २० विमानतळांवर प्रवाशांना छायाचित्रे काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ‘डीजीसीए’ने शुक्रवारी नवीन मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या असून, त्यानुसार पुणे विमानतळावर उड्डाण करणाऱ्या अथवा उतरणाऱ्या विमानांतील प्रवाशांना विमान १० हजार फूट उंचीच्या आत असेल तर खिडकीचे आवरण बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, विमान कंपन्या तशा सूचना प्रवाशांना देत आहेत.
पुणे विमानतळ हे हवाईदलाचे तळ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावानंतर ‘डीजीसीए’ने पहिल्यांदाच १० हजार फूट उंचीपर्यंत प्रवाशांना खिडकीतून छायाचित्रीकरण करण्यास बंदी घातली आहे. ‘डीजीसीए’ तशा सूचना विमान कंपन्यांना दिल्यानंतर विमान कंपन्यांनी लगेच त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. पुण्याहून विमान झेपावल्यानंतर दहा मिनिटांपर्यंत आणि पुण्यात विमान उतरण्यापूर्वी दहा मिनिटे आधी प्रवाशांना खिडक्यांचे आवरण बंद करण्यास सांगितले जात आहे.

असा आहेत सूचना
- सामान्यपणे विमान कंपन्यांकडून विमानांचे उड्डाण आणि लँडिंग करतेवेळी प्रवाशांना खिडक्यांचे आवरण बंद काढण्यास सांगितले जाते
- त्याचे प्रमुख कारण विमानांच्या बाहेर पंखाजवळ काही घडत असेल ते तत्काळ कळावे म्हणून
- विमानात बसल्यानंतर प्रकाशासाठी खिडक्यांचे आवरण उघडे ठेवण्यास सांगितले जाते
- आपत्कालीन खिडकीचे आवरण उघडे ठेवण्यास सांगितले जाते व अन्य खिडक्यांचे बंद ठेवण्यास सांगितले जाते

सेल्फी, फोटोंना बंदी
- अनेक प्रवासी बोर्डिंग गेटमधून आत जाताना फोटो अथवा सेल्फी काढतात. तिथे फोटोवर बंदी घातली आहे
- एरोब्रिज नसलेल्या ठिकाणी लॅडरजवळदेखील अनेक प्रवासी फोटो काढतात. आता त्यांनादेखील मज्जाव केला आहे
- प्रशासनाने विमानतळावर ठिकठिकाणी तशा सूचनांचे फलक लावले आहेत
- प्रवाशांच्या माहितीसाठी उद्‍घोषणादेखील केल्या जात आहेत

या विमानतळाचा समावेश
पुणे, लेह, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, आदमपूर, चंडीगड, भटिंडा, जैसलमेर, बिकानेर, जोधपूर, हिंडन, आग्रा, कानपूर, बरेली, ग्वालियर, गोरखपूर, भूज, गोवा, विशाखापट्टणम आदी विमानतळांवर ‘डीजीसीए’चा नियम लागू आहे.

विमानतळाच्या आवारात प्रवाशांनी छायाचित्रीकरण करू नये म्हणून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. विमान कंपन्यांनादेखील सूचना दिल्या आहेत. ‘डीजीसीए’च्या सर्व सूचनांचे पालन केले जात आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...

SCROLL FOR NEXT